Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


त्या विधानाप्रकरणी साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - भारताच्या वाढत्या लोकसंख्येला ४ बायका आणि ४० मुले या संकल्पनेला पाठिंबा देणारे लोक जबाबदार आहेत, असे वक्तव्य करणाऱ्या साक्षी महाराजा यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. एका कार्यक्रमादरम्यान साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या बोलण्याचा रोख हा मुस्लीम समाजाकडे होता. या व्यतिरिक्त ते तिहेरी तलाक पद्धतीविरोधातही बोलले. या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने साक्षी महाराजांकडून बुधवारपर्यंत खुलासा मागितले आहे. या विधानावर साक्षी महाराज म्हणाले होते की, भारताची लोकसंख्या सध्या १३२ कोटी आहे. जर आपण या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर लोकसंख्या प्रमाणाबाहेर जाईल. त्यासाठी आपल्याकडे कायदा हवा. कोणत्याही धर्माची महिला असेल तिचा आदर व्हायला हवा. त्यामुळेच ४ बायका आणि ४० मुले असा विचार सहन केला जाणार नाही. या प्रकरणी साक्षी महाराजांच्याविरोधात सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधानाच्या २९८, १८८, २९५ ए, १३५ बी या कलमांनुसार तक्रार दाखल केली आहे. या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने मेरठ प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे साक्षी महाराज अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin