Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


अखेर मुलायमसिंह यादव यांची माघार


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहावर अखेर पडदा पडला आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अखिलेश यादवच असतील असे सांगत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर समाजवादी पक्षातील फूट टळली आहे. अखिलेश यांच्यासोबत पक्षाचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त आमदार असल्याने मुलायम सिंह यांना माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान, भाजपने पक्षातील वाद हा पितापुत्रांतील स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी पक्षचिन्हावर दावा करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही गटांनी कागदपत्रांचे गठ्ठे निवडणूक आयोगाकडे सादर करत आपली दावेदारी मजबूत केल्याने सपा फुटण्याच्याच मार्गावर होती. आयोगाला कागदपत्रे सादर केल्यानंतरही मुलायम यांनी समेटाचे संकेत दिले होते. अखिलेश माझा मुलगा आहे. आमच्या दोघांत काहीच मतभेद नाहीत. मात्र, एका व्यक्तीमुळे पक्षात काही वाद आहेत, असेही ते म्हणाले. त्यांचा इशारा रामगोपाल यादव यांच्याकडे होता. त्यानुसार रामगोपाल यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे पत्र उपराष्ट्रपती कार्यालयाला पाठवले आणि दुसरीकडे सायकल चिन्हावरील दावा मागे घेतला.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin