Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


भोसरीत विलास लांडेंची राजकीय वाट बिकट; महेश लांडगे राजकारणात सुस्साट


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढत्या राजकीय ताकदीमुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे मात्र राजकीय स्वप्नांना नवी उभारी येणार असल्याची राजकीय चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची राजकीय वाट बिकट बनली असून, विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अडीच वर्षानंतर देखील मोदी लाट कायम आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत लांडे यांची राजकीय नाकेबंदी होणार असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजप धक्का देणार हे आता निश्चित झाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर आझम पानसरे ही त्रिमूर्ती एकत्र आल्यामुळे भाजपला हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात आधीच राजकीय ताकद निर्माण केलेल्या भाजपला पानसरे यांच्या प्रवेश केल्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातही “अच्छे दिन” आले आहेत. या मतदारसंघातील झोपडपट्टीबहुल भागात पानसरेंच्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेत हॅट्रटिक करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न भंगणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin