Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - मेदिनीपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यास जीवे मारण्यात येईल, अशी धमकी टीम इंडियाचा माजी कर्णधार व बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली याला देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र सौरव गांगुलीला ७ जानेवारीला मिळाले असून याची माहिती गांगुलीने पोलीस आणि आयोजकांना दिली आहे. येत्या १९ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संघाद्वारे मेदिनीपूर विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यक्रमात सामील होण्याबाबत अद्याप त्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. गांगुली म्हणाला, कार्यक्रमात सहभागी होण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. हा एक ‘लाइव्ह शो’ होणार आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमात जाणार की नाही तुम्हा सर्वांना समजेल असेही तो म्हणाला. बंगाल क्रिकेट संघटनेच्या बैठकीनंतर गांगुलीने याची माहिती माध्यमांना दिली. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत संघटनेने बैठकीचे आयोजन केले होते.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin