Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


पेट्रोलपंपावर १३ जानेवारीनंतरही कार्डने पैसे स्वीकारणार – पेट्रोलियम मंत्री


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - डिजिटल व्यवहारांसाठी ग्राहकांना आणि पेट्रोलपंप चालकांना १३ जानेवारीनंतर देखील कुठल्याही प्रकारचा अधिकचा कर भरावा लागणार नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारनंतरही (दि. १३) डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट स्वीकारले जाईल. पेट्रोल पंप आणि बँकांमध्ये सुरु असलेला वाद सुटेल, असे सांगून धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. ऑनलाईन आणि डिजिटल व्यवहारांवरील कराचा भार नेमका कुणी पेलायचा यावर बँका आणि तेल कंपन्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे प्रधान यांनी सांगितले. काही खासगी बँकांनी मर्चंट डिस्काऊंट रेटच्या (एमडीआर) नावाखाली १ हजार रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारावर ०.२५ टक्के २ हजारापर्यंतच्या व्यवहारावर ०.५० टक्के, तर त्यावरील व्यवहारावर १ टक्का कर घोषित केला. ज्याचा भार पंपचालकांना उचलावा लागणार होता. त्यामुळे देशातील ५० हजाराहून अधिक पंपचालकांनी याविरोधात बंदचे हत्यार उपसल्याने हा निर्णय १३ जानेवारीपर्यंत मागे घेण्यात आला होता.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin