Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


राष्ट्रवादीच्या आमदाराची बँकेच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ; पोलिसांत गुन्हा दाखल


Main News

सेलू, दि. १० (पीसीबी) - सेलू येथील देना बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक गौतम घोडके यांना बँकेच्या शाखेत जाऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांच्यावर सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेत जबरीने घुसून शासकीय कामात अडथळा करून शिवीगाळ केल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भांबळे यांच्या निषेधार्थ सोमवारी दिवसभर बँकेचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. यात खातेदारांची मोठी गैरसोय झाली. आमदार भांबळे यांनी शनिवारी बँकेच्या शाखेत जावून व्यवस्थापक गौतम घोडके यांना शिवीगाळ केली, अशी तक्रार घोडके यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशासनाकडे केली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर सोमवारी बँकेच्या व्यवस्थापनाने काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे फलकही बँक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दर्शनी भागात लावले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून बँकेचे कामकाज बंदच ठेवण्यात आले. नागपूर येथील देना बँकेच्या विभागीय कार्यालयाकडून कायदेशिरदृष्टया परवानगी मिळाल्यानंतर शाखा व्यवस्थापकासह सर्व कर्मचाऱ्यांनी सेलू पोलिस ठाण्यात जावून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. देना बँकेचे शाखा व्यवस्थापक गौतम घोडके यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात आमदार भांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin