Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी नाही – अरूण जेटली


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर अर्थव्यवस्थेत मंदीसदृश वातावरण तयार झाल्याचा स्पष्ट इन्कार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. अप्रत्यक्ष करसंकलनात नोटाबंदीनंतर १४.२ टक्के वाढ झाली आहे. नोटाबंदीचा परिणाम झाला नसल्याचेच हे द्योतक आहे, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले. डिसेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर रोकडटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवली होती. तरीही उत्पादन शुल्क संकलनात ३१.६ टक्के वाढ दिसून आली आहे. सेवाकरात १२.४ टक्के वाढ झाली आहे. मात्र, सीमाशुल्क संकलनात ६.३ टक्के घसरण नोंदवली गेली आहे. सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे सीमाशुल्क कमी प्रमाणात संकलित झाल्याचे जेटली यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर २०१६ या काळात अप्रत्यक्ष करांमध्ये २५ टक्के वाढ होऊन अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ८१ टक्के कर या काळात गोळा केला गेला. याच काळात प्रत्यक्ष कर संकलनातही १२.०१ टक्के वाढ होऊन ५.५३ लाख कोटी रुपये कर संकलित झाला.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin