Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


सोलापूर येथे राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन


Main News

सोलापूर, दि. १२ (पीसीबी) - सोलापूर येथे संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संभाजी आरमार या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी फेसबुकवर जनतेशी थेट संवाद साधला होता. यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

सोलापूर येथील जुना पुणे नाका येथील संभाजी महाराज चौकात संघटनेचे कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी राज ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी फौजदार चावडी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin