Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर गांधीजींऐवजी मोदींचा फोटो


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरील महात्मा गांधींचा फोटो हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत मुंबईत विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात आज दुपारी अनेक कर्मचाऱ्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आत्मक्लेष करून घेतला. 

स्वदेशीची चळवळ उभारणाऱ्या महात्मा गांधींनी नेहमीच खादीचा आग्रह धरला. त्या विचारांतूनच खादी आणि ग्रामोद्योगाचा देशभर प्रसार झाला. असं असतानाच वर्षानुवर्षांची परंपरा मोडून खुद्द खादी आणि ग्रामोद्योग आयोगानेच महात्मा गांधी यांचा फोटो वार्षिक कॅलेंडर व डायरीतून वगळली आहे. त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरख्यावरील फोटो लावण्यात आला आहे. कॅलेंडरच्या बाराही पानांवर मोदी यांचाच फोटो आहे. यामुळे कर्मचारी वर्गाने उघड नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. 

गेल्यावर्षी ही बाब कर्मचाऱ्यांनी चेअरमन विनयकुमार सक्सेना तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी पुढच्यावर्षी यात दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र यावर्षीही यात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. याबाबत काल खादी ग्रामोद्योगच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एक तातडीची सभा घेण्यात आली. या सभेत गुरुवारी जेवणाच्या वेळेत दुपारी दीड ते दोन दरम्यान प्रार्थना कक्षात आत्मक्लेष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप महात्मा गांधी यांचा फोटो हटवण्यास आहे. गांधी आणि खादी हे अतुट नातं आहे आणि खादी व ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरून गांधीजींचा फोटो हटवणे हा त्यांचा अपमान आहे. म्हणूनच आम्ही आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवत आहोत, असे कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin