Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


आता रिलायन्स जिओ ९९९ रुपयांमध्ये ४ जी स्मार्टफोन आणणार


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - दूरसंचार कंपन्यांना दणका दिल्यानंतर आता लवकरच रिलायन्स जिओ स्मार्ट फोन निर्मात्या कंपन्यांनादेखील धक्का देणार आहे. रिलायन्स जिओकडून कमी किमतीचे ४ जी स्मार्टफोन बाजारात आणले जाणार आहे. त्या मुळे आता दूरसंचार क्षेत्रानंतर स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रात मोठी खळबळ माजण्याची दाट शक्यता आहे.

लवकरच रिलायन्स जिओकडून ४जी व्हाईस ओवर एलटीई किंवा व्हिओ एलटीई तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या फोनसोबत मोफत कॉल्सची सुविधादेखील रिलायन्स जिओकडून दिली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये रिलायन्स जिओचे स्मार्टफोन बाजारात येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ९९९ रुपये आणि १,५०० रुपये असणार आहे. त्यामुऴे स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रात मोठी उलथपालत होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओने ४ जी व्हाईस ओवर एलटीई स्मार्टफोन बाजारात आणल्यास त्याचा बाजारावर मोठा परिणाम होईल. रिलायन्स जिओचे स्मार्टफोन इतर स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यासमोर मोठे आव्हान उभे करतील. रिलायन्स जिओचे स्मार्टफोन स्वस्त असणार असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिऴेल, असे सायबरमीडिया रिसर्चने प्रिन्सिपल ऍनलिस्ट फैझल कवूसा यांनी म्हटले आहे.

रिलायन्स जिओच्या फोनमध्ये फ्रन्ट आणि रिअर कॅमेरे असतील अशी शक्यता आहे. याशिवाय जिओ चॅट, लाईव्ह टिव्ही, आणि व्हिडीओ ऑन डिमांड यांच्यासारख्या सुविधा रिलायन्स जिओच्या फोनमध्ये असतील. यासोबतच डिजीटल वॉलेट, जिओ मनी वॉलेट अशा विविध सेवांचा समावेश असणात आहे.

जिओच्या स्मार्टफोनचा मोठा फटका भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन कंपन्याना बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. २०१७ च्या तिमाहीत अनेक कंपन्यांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. गेल्या जानेवारी ते मार्चच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी ते मार्च महिन्यातील स्मार्टफोनच्या विक्रीत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. आता रिलायन्स जिओ कंपनीच्या स्मार्टफोनच्या एन्ट्रीनंतर इतर स्मार्टफोन कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin