Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


शिवसेनाप्रमुखांचे स्मारक आचारसंहितेच्या कचाट्यात


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – दादर येथील महापौर निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव बुधवारी सुधार समितीत मंजूर करण्यात आला. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने महापालिका सभागृहाच्या मंजूरीअभावी महापौर निवासस्थानाचे हस्तांतरण रखडणार असून आता मार्चमध्ये हा प्रस्ताव मंजूर होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला हस्तांतरीत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. निवडणुकीपूर्वी हे निवासस्थान स्मारक समितीला हस्तांतरीत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. मात्र सुधार समितीत प्रस्ताव सादर न झाल्याने हस्तांतरीत मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी हा प्रस्ताव मंजुर करुन घेण्यासाठी बोलावलेल्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. मात्र पालिका सभागृहाची मंजुरी आवश्यक असल्याने हा प्रस्ताव दोन महिने रखडणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin