Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


फेसबुकडून मराठी तरुणाला कौतुकाची थाप


Main News

नागपूर, दि.१२ (पीसीबी) – सध्या स्टार्टअप्सचा बोलबाला असतानाच एका २८ वर्षीय तरुणाने सुरू केलेल्या स्टार्टअपला थेट फेसबुककडून कौतूकाची थाप मिळाली आहे. सत्यजित जाधव या तरुणाच्याहॉपबकेट’ (hopbucket) अपचीएफबीस्टार्टया मेंटॉरशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. भारतातून केवळ तीन स्टार्टअप्स यासाठी निवडले गेले होते. त्यापैकी हे एक आहे. त्यासाठी सत्यजितला फेसबुककडून ४० हजार डॉलर्सपर्यंत क्रेडिट्स मिळणार आहेत. मानाच्या समजल्या जाणाऱ्या मेंटॉरशिप प्रोग्रामसाठी निवड झाल्याने सत्यजितला आता फेसबुकच्या अनेक सुविधा आणि ओपन सोर्स टूल्स वापरता येतील.

मुळातहॉपबकेटहे एक नविन ट्रॅव्हल प्लॅनिंग अप आहे. प्रवासाचे प्लॅनिंग करण्याबरोबरच लोक  या अपमार्फत त्यांचे प्रवासाचे अनुभवही शेअर करू शकतील. त्यांचे प्रवासवर्णन इथे वाचता येतील. हेअप लाँच झाल्यापासून म्हणजेच गेल्या दोन महिन्यात हजारो लोकांनी हे अप डाउनलोड केले आहे. यातूनच त्याच्या उपयुक्ततेचा अंदाज बांधता येऊ शकतो. हे अप ऑफलाईनही काम करते हे विशेष. सध्या तरी हे अप अँड्रॉइडवर उपलब्ध असून लवकरच त्याचे आयओएस व्हर्जनही येणार असल्याचे सत्यजीत सांगतो.

मुळचा नागपूरकर असलेल्या सत्यजितने पुढे पुण्यातून इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटामध्ये त्याने शिक्षण घेतले. ‘हॉपबकेचही तीन जाणांची टीम आहे ज्यात सत्यजितसोबत एक अँड्रॉइड डेव्हलपर आणि एक ट्रॅव्हल ब्लॉगर काम करतो. आता भविष्यात काय असे विचारल्यावर तो सांगतो, कीएऱव्ही स्टार्टअप म्हटल्यावर कुणाचीही फारसे पैसे गुंतवण्याची तयारी नसते. पण आता फेसबुकच्या पाठिंब्याने आत्मविश्वास वाढला आहे. येत्या काळात टीम वाढवणे, कुशल लोकांचा समावेश टीममध्ये करणे, जास्तीत जास्त लोकांना उपयुक्त ठरेल अशा सुविधा देणे यावर आमचे लक्ष आहे’.

अमेरिकेत मी पॅकेज टूर करता थेट स्वतःच फिरायला जायचो. तेव्हा कुठेही जाण्याच्या आधी काय बघायचे, काय आणि कुठे खायचे अशी सगळी माहिती मी मित्रांना विचारून ठेवायचो. त्यातूनच या अपची कल्पना मला सुचली.

 

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin