Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


पाकिस्तानाच्या ताब्यातील चंदू चव्हाण लवकरच मायदेशी परतणार


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण लवकरच मायदेशी परतणार आहेत. चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी  माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. 

मूळचे धुळ्याचे असणारे २२ वर्षांचे चंदू चव्हाण ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होते. ३० सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. यानंतर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले. ‘चंदू चव्हाण यांच्याविषयी दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत चर्चा झाली. चंदू चव्हाण सुरक्षित असून त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या डिजीएमओंनी दिली. चंदू चव्हाण यांची लवकरच मुक्तता करण्यात येईल, असेदेखील पाकिस्तानच्या डिजीएमओंनी सांगितले,’ अशी माहिती भामरे यांनी दिली आहे.

चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी डिजीएमओ स्तरावर चर्चा सुरू आहे. चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी भारताच्या डिजीएमओंनी १५ ते २० वेळा पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत संवाद साधला आहे. त्यांनी चंदू चव्हाण सुरक्षित असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल, असे म्हटले आहे,’ अशी माहिती सुभाष भामरे यांनी दिली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin