Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


नितेश राणेंवर गुन्हा दाखल करणार की नाही- न्यायालयाचा सवाल


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – कार्यकर्त्यांकरवी  व्यावसायिकाला धमकावल्याच्या आरोपाप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणार की नाही याचा निर्णय एक आठवड्यात घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वांद्रे पोलिसांना दिले आहेत. गुन्हा नोंदवला जाऊ शकत नसेल तर तो का येत नाही, याची कारणमीमांसाही पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नितेश यांच्या समर्थकांनी कार्यालयात घुसून ते रिकामे करण्यासाठी आपल्याला धमकावल्याचा आरोप करणारी याचिका रोहित कंधारी या व्यावसायिकाने केली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकेतील आरोपांची दखल घेत नितेश यांच्यावर गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने वांद्रे पोलिसांना दिले.

नितेश यांच्या समर्थकांकडून आपल्या व कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याची भीती कंधारी यांनी व्यक्त केल्यावर पोलीस संरक्षणासाठी पोलिसांकडे अर्ज करण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin