Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


काँग्रेस व राष्ट्रवादीची भिस्त ग्रामीण भागावर


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राज्यातील सुमारे चार कोटींपेक्षा जास्त नागरिक मतदानाचा हक्क बजाविणार असणाऱ्या दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्तेतील भागीदार भाजप आणि शिवसेनेतच जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. नगरपालिका निवडणुकांचा कौल महापालिकांमध्ये कायम राहिल, असा भाजपच्या गोटात विश्वास असताना, मुंबई व ठाण्याचे गड कायम राखण्याकरिता शिवसेनेची कसोटी लागणार आहे. ग्रामीण भागातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पारंपारिक वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने जोर लावला आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये सारे लक्ष हे मुंबईवर आहे. गेली लागोपाठ २० वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला सत्तेतून दूर करण्याकरिता भाजपने शड्डू ठोकला आहे. युतीची चर्चा असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एकूणच भूमिका लक्षात घेता युती होण्याबाबत साशंकता आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला डोके वर काढू द्यायचे नाही, अशी भाजपची व्यूहरचना आहे. शिवसेनाही विधानसभा निवडणुकीचे उट्टे काढण्याकरिता उत्सुक आहे. मुंबई गमविल्यास शिवसेनेला मोठा धक्का असेल. राज्यात भाजपची ताकद वाढवायची असल्यास शिवसेनेचे अस्तित्व कमी व्हायला पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.

शिवसेना आणि ठाणे हे  १९६६ पासूनचे समीकरण आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात शिवसेनेला धडा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण ठाण्यात भाजपची ताकदच मुळात मर्यादित आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. कळवा, मुंब्रा-दिवा परिसरांमध्ये वाढलेले प्रभाग हे राष्ट्रवादीला फायदेशीर ठरणार आहेत. उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तिरंगी लढत होणार आहे. भाजपने शिवसेनेपुढे आव्हान उभे केले आहे.

नाशिकमध्ये गेल्या वेळी मनसेला सत्ता मिळाली होती. यंदा मनसेत मोठय़ा प्रमाणावर फूट पडली आहे. राज ठाकरे यांच्या करिश्म्यावर मनसे निभावून नेते का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला शह देण्याकरिता भाजपने कंबर कसली आहे. नागपूर, अमरावती आणि अकोला या विदर्भातील तिन्ही महापालिका सर करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. सोलापूरची सत्ता कायम राखताना काँग्रेसला घाम फुटण्याची चिन्हे आहेत.

मराठा मोर्चा किंवा नोटाबंदीचा फटका नगरपालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला बसला नाही. नोटाबंदीवरून विरोधकांनी वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुस्लीम मतदारांचा कौल काही प्रमाणात एमआयएमकडे वळल्याचे नगरपालिका निवडणुकांमध्ये बघायला मिळाले. हा कल काँग्रेससाठी धोकादायक ठरणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin