Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


मुंबईत युतीसाठी जागांची रस्सीखेच; भाजपची ११५ जागांची मागणी


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपशी युतीसाठी चर्चेची जाहीर अपेक्षा व्यक्त केल्याने भाजपने त्याला प्रतिसाद दिल्याचा सणसणीत टोला मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी लगावला आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शी राहील, या अटीवरच युती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करीत असून ठाकरे यांनाच युतीची गरज वाटत असल्याचे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण तरीही ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात युती करावी, अशी भावना असल्याचे सांगत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु करण्यात आले असून मुंबई महापालिकेच्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे.

भाजपला ११५ जागांची अपेक्षा असून शिवसेना मात्र ८५-९० पर्यंत जागा सोडण्यास तयार आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, चर्चा लवकर झाली, तर ठीक नाहीतर  कुठेतरी थांबवून निर्णय घ्यावा लागेल व माझी तयारी सुरु असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. युतीसाठी लवकर चर्चा सुरु व्हावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली होती. निवडणुकीची घोषणाही बुधवारी झाली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी अॅड शेलार व अन्य नेत्यांची बैठक झाली.

शिवसेना भाजपसाठी ८५-९० जागा देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपही १०० ते १०५ जागांवर तडजोड करण्याची शक्यता असल्याचे समजते. शिवसेनेतर्फे खासदार अनिल देसाई, अनिल परब तर भाजपकडून अॅड शेलार यांच्यासह काही नेते मुंबई व ठाण्याबाबत चर्चा करीत आहेत.

युतीबाबत स्थानिक ठिकाणी अधिकार
ठाण्यात शिवसेनेचे प्राबल्य असून भाजपची ताकद फारशी नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आदी महापालिकांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये युती करण्याचे अधिकार शिवसेनेने जिल्हा प्रमुखांना दिले आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांशी ते चर्चा करतील. त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक युती व आघाड्या होण्याची शक्यता आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin