Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


नागपुरात ५० हजार स्वस्त घरे देणार; टेंडर निघाले


Main News

नागपूर, दि. १२ (पीसीबी) – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपुरात ५० हजार स्वस्त घरे उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० हजार घरे तयार करण्यात येणार आहेत. नागपूर सुधार प्रन्यासने या १० हजार घरांसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. २०१९ पर्यंत ५० हजार घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत केंद्र सरकारने देशातील बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याची योजना तयार केली आहे. महाराष्ट्र सरकार २०२२ पर्यंत थांबणार नसून २०१९ पर्यंतच राज्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना हक्काची पक्की घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपुरात ५० हजार स्वस्त घरे उभारण्यात येणार आहेत. घरांचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या गरिबांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. सुमारे ३०० चौरस फुटांचे घर अवघ्या अडीच लाखांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मौजा तरोडी (खुर्द), मौजा जयताळा, मौजा भरतवाडा-पुनापूर या चार जागांवर १५ हजार १९६ घरकुलांचे नियोजन करण्यात आले असल्याचे नासुप्रकडून कळविण्यात आले.

योजनेंतर्गत नागपूर शहरात ५० हजार घरकुलाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. ही योजना संपूर्ण शहरात टप्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे या संकल्पनेंतर्गत वाठोडा येथे ३०८ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुलांचा कार्यक्रम राबविण्यात येत असून हा प्रकल्प ३६.२४ कोटी रुपयांचा आहे. तसेच मौजा वांजरी येथील २.४५३ हेक्टर जागेवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ९३.५२ कोटी रुपये खर्च करून ९६० घरकुले बांधण्यात येणार आहे. म्हाडाच्यावतीने ७५८ घरकुले बांधण्यात येणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये...
कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावे, या कुटुंबातील सदस्यांच्या नावे कुठेच घर नसावे, दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी ३० चौ.मी.पर्यंत चटई क्षेत्रफळाचे घरकुल, दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना केंद्राकडून दीड लाख, राज्य शासनाकडून १ लाख मिळेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin