Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


मतदार यादीत तुमचे नाव आहे का? इथे सर्च करा


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी)- राज्यातील १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता मतदार यादीत नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी मतदारांची धावपळ सुरु होईल. मात्र, आता मतदार यादीतील नाव ऑनलाईन तपासता येणार आहे. ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपले नाव मतदार यादीत आहे का नाही हे अताच पहा.

मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. आपले नाव पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https;//103.23.150.139/Marathi/ याशिवाय https;//ceo.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरही आपले मतदार यादीतील नाव शोधता येईल.

असे पाहा आपले नाव

राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर ‘Name wise’ आणि ‘ID Card Wise’ हे दोन पर्याय उपलब्ध असतील, त्यातील ‘Name Wise’ पर्यायवर क्लिक केल्यानंतर पुढे ‘District’ आणि Assembly’ दोन पर्याय समोर येतील, त्यापैकी ‘Assembly’ हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील, त्यामध्ये पहिला पर्याय असले तो ‘Select District’ त्या पर्यायात तुमच्या जिल्हाचे नाव टाका, त्या पुढचा पर्याय ‘Select Assembly’ म्हणेजेच तुमचा मरदारसंघ. त्या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघाचे नाव निवडा, त्यानंतर तुमचे नाव टाका. (तुमचे नाव, अडनाव, वडिलांचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करणे बंधनकारक आहे.), त्यानंतर तुमचे आडनाव टाका, त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका, हे सर्व रखाने भरल्यानंतर ‘Search’ या पर्यायवर क्किक करा.

ही प्रकिया पूर्ण करताच तुमचे नाव मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. याशिवाय तुम्हाला तुमचे मतदान केंद्र पाहायचे त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. याशिवाय तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहता येणार आहे. ही संपूर्ण प्रकिया पार केल्यानंतरही नाव न अल्यास, नावाची स्पेलिंग पुन्हा एकदा चेक करा. लक्षात ठेवा की, सर्च करताना तुमचे नाव आणि उर्वरित तपशील इंग्रजीत भरावयाचा आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin