Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


ओम पुरी यांच्या मृत्यूमागे घातपात?


Main News

मुंबई, दि.११ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झालेला नाही, असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले असून ओम पुरी यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, ओम पुरी यांच्या मृत्यूला ५ दिवस उमटले तरी त्यांचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.
 
ओम पुरी यांच्या डोक्याला मागच्या बाजूला दीड इंच खोल वर लांब जखम आढळली होती. ही जखम नेमकी कशामुळे झाली. त्यांना कुणी मारहाण केली होती का?, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला असून त्यादिशेने तपास सुरू झाला आहे.  
 
ओम पुरी यांच्याकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरला जबाबही महत्वाचा ठरला आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री ओम पुरी अस्वस्थ होते. त्यांनी मद्यपान केले होते. त्यात पत्नी नंदिनीशी कडाक्याचे भांडण झाले होते, असे त्याने आपल्या जबाबात म्हटले आहे.
 
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी पुरी यांच्या जवळच्या पाच व्यक्तींचे जबाब नोंदवून घेतले असून गरज भासल्यास पुरी यांची दुसरी पत्नी नंदिता पुरी यांची चौकशी केली जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेज तसेच पुरी यांचा मृत्यू झाला त्याआधी त्यांच्या घरी येणाऱ्या सगळ्यांचीच चौकशी होण्याची शक्यता आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin