Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


पोलिसांची गांधीगिरी ! हेल्मेट नाही, मग निबंध लिहा


Main News

नाशिक, दि. ११ (पीसीबी) – बाईकने ऑफीसला निघालेला रोहन मुंबई नाका परिसरात येताच ३०-४० वाहतूक पोलिसांचा ताफा समोर पाहून घाबरला. कारण त्याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते. चला आता दंड भरा असा त्याने मनोमन विचार करताच समोरील पोलिस कर्मचाऱ्याने त्याला वाहन बाजूला घ्या. असे सौज्यन्याने सांगितले. रोहनने गाडी बाजूला घेतली. त्याला वाटले आता दंड मागतील नाहीतर गाडी जमा करुन घेतील. बघू काय होते ते. तोच ते पोलिस हातात एक कोरा कागद घेऊन आले. हेल्मेट नाही ना, चला हा कागद घ्या आणि ‘हेल्मेट वापरण्याचे फायदे तोटे’ या विषयावर निबंध लिहा. निबंध लिहायचा नसेलतर मग ५०० रुपये दंड भरा.

हे शब्द रोहनच्या कानावर पडताच काय करु आणि काय नाही असे झाले अणि ऑफिसला उशीर होतोय पाहून त्याने तो कागद हातात घेत लगेच निबंध लिहायला सुरुवात केली. मुंबई नाका परीसरात रस्त्याच्या कडेला पोलिसांचा ताफा विना हेल्मेट येणाऱ्या वाहनधारकांची गाडी थांबवत त्यास निबंध लिहायला सांगत. काहींनी वेऴ वाचवण्यासाठी दंड भरला तर काही आम्हाला वाचता लिहता येत नसल्याचे म्हणत स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत होते.

परंतू ज्यांना लिहता वाचता येत नाही अशांची पोलिसांनी तोंडी परिक्षा घेतली हा निबंध लिहीणाऱ्यांसाठी खास बाकावर बसण्याची सोय देखील केली होती. ‘हेल्मेट सक्ती’ बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दाखला देवून शहर वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाच्या संपूर्ण तपशिलासह ‘हेल्मेट वापराचे फायदे आणि तोटे’ ४०० शब्दात लिहण्याची सूचना करण्यात आली. आपल्याला मराठी भाषा येत नसल्याचे ज्या वाहनधारकांनी सांगितले त्यांना हिंदी व इंग्रजीचा पर्याय होता.

विशेष म्हणजे या निबंध लिहण्याच्या अनोख्या स्पर्धेत विजेत्यांचा विशेष पारितोषिकाने सन्मान देखील केला जाणार असल्याचे वाहतूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या अनोख्या दंड वजा स्पर्धेचे अनेकांनी स्वागत केले.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin