Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


निवडणूक खर्चासाठी राजकीय पक्षांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राज्यातील १० महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. 

निवडणुकीदरम्यान, निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे आणि पारदर्शकपणे पार पडावी तसेच राजकीय पक्षांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारे भुलवणे किंवा त्यांना आकर्षित करण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. यामध्ये पोलीस विभाग, आयकर विभाग , राज्य उत्पादन शुल्क विभाग यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. या समितीमध्ये कोणाचा समावेश करायचा याचे अंतिम अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मनपा आयुक्तांना असतील.

दरम्यान, निवडणूक संपल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने ३० दिवसांच्या मुदतीमध्ये निवडणुकीच्या खर्चाचा तपशील आयोगापुढे सादर करणे बंधनकारक आहे. तर राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केलेल्या निवडणूक खर्चाचा तपशील ६० दिवसांत सादर करावा लागणार आहे. याशिवाय, या निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार असून निवडणुकीचा खर्च त्यामधूनच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin