Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


शाहरूखच्या ‘रईस’चे प्रदर्शन रोखण्याची धमकी


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – ‘रईस’ सिनेमाच्या प्रदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेवेकडून अडथळा येणार नाही याची भलेही शाहरूख खानने तजवीज केली असेल, पण त्याच्यापुढचे संकट इथेच संपलेले नाही. आता मनसेचा प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेनेचे संकट ‘रईस’ पुढे ऊभे राहिले आहे. अक्षय राठी या वितरकांना रईसचे प्रदर्शन रोखण्याची धमकी छत्तीसगडच्या शिवसेना शाखेने केली आहे. आपल्या टिव्टर अकाउंटवर त्यांनी तसे जाहीर केले आहे. रईसमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची भूमिका आहे.
 
जर २५ जानेवारीला छत्तीसगडमध्ये ‘रईस’ प्रदर्शित केला तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी लेखी धमकी येथील पक्ष शाखेने राठी यांना दिली आहे. हे पत्रच राठी यांनी टिव्टरवर शेअर केले आहे आणि शाहरुखच्या फॅन्सना हा प्रकार उजेडात आणण्याचे आवाहन केले आहे. राठी यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्री कार्यालयाला या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सुरक्षा व्यवस्था देण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही राठी यांनी टॅग केले असून शिवसेनेचा छत्तीसगडच्या या शाखेच्या कृतीला पाठिंबा आहे का अशी विचारणा केली आहे.
 
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ नंतर सर्वांचाच शाहरुखच्या ‘रईस’ चा माहिराच्या भूमिकेमुळे काय वाद उद्भवतो याकडे लक्ष होते. शाहरुखला त्याच्या याआधीच्या ‘माय नेम इज खान’ सिनेमाच्या वेळीही शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin