Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


...आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मिळणार वाहन परवाना


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – महाविद्यालयीन विद्यार्थ्यी वाहन परवाना नसतानाही वाहन चालवत असल्याचे चित्र राज्यभरात दिसते. त्यामुळे अनेक अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता राज्यातील सर्व महाविद्यालयात विद्यार्थांना दुचाकी चारचाकी वाहतुकीचा शिकाऊ परवाना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावनी १६ जानेवारीपासून होणार आहे. मुंबईच्या किर्ती महाविद्‌यालयापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना महाविद्‌यालयीन शिक्षण घेत असताना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेता येणार आहे. याचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.  

या निर्णयानुसार परिवहन मंत्रालयामार्फत महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ठराविक वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर आरटीओ कार्यालयात त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर आरटीओ कार्यालयात विद्यार्थ्यांना पक्का वाहन परवाना देण्यात येणार आहे.  


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin