Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


युतीबाबत अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेणार - उद्धव ठाकरे


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी)  - शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांकडून युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. आज सकाळी भाजपा नेत्यांची मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेला युतीबाबत निमंत्रण देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांना बोलताना म्हणाले की, मी युतीबाबत कधी नकारात्मक नव्हतो, जागावाटपाबात माझ्याकडे एक नवा फॉर्म्युला आहे. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी ३-३ नेते जागा वाटपाची चर्चा करतील, पण अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  
 
मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण जागावाटप झाल्यावरचं अंतिम चित्र समोर येईल. आजपासून युतीच्या जागावाटपासाठी चर्चा सुरु करणार असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, युती करायचीच असेल तर ती लवकर व्हायला हवी, अन्यथा निवडणुका होऊन जातील,' अशी भावना दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यांनी जाहीरपणे मांडलेल्या या भूमिकेला भाजपकडून प्रतिसाद मिळेल, असे बोलले जात होते. त्यानुसार भाजपने शिवसेनेला युतीच्या चर्चेसाठी आमंत्रण देण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin