Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


गावोगावी आर्ची आणि परशाचा शोध; निर्माते दिग्दर्शक कलाकारांच्या शोधात


Main News

मुंबई, दि.११ (पीसीबी) – धो-धो चाललेल्या सैराटमुळे नवोदीत आर्ची- परशाचं नशीबच पालटलं. महाराष्ट्रातल्या अशा अनेक आर्ची – परशांसाठी खोऱ्याने संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही दिवसात निर्माते- दिग्दर्शक अशा हुरहुन्नरी कलाकारांच्या शोधात महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात फिरताहेत.

वेगवेगळ्या एकाकिका स्पर्धा, ऑडिशन्सबद्दल चटकन उपलब्ध होणारी माहिती यामुळे मोठ्या शहरातल्या कलाकारांना मालिका, सिनेमांमध्ये झटपट संधी मिळत असतात. पण ग्रामीण कलाकारांवर सिनेमावाले मेहरबान झाले आहे. मुंबई- पुणे- नाशिक या सारखी शहरे सोडून ग्रामीण भागातले कलाकार शोधण्यासाठी निर्माते- दिग्दर्शक तिथले दौरे करु लागले आहेत. अनेक कलाकारांना आगामी सिनेमांमधून संधीची दारे खुली झाली आहेत.

गेल्या काही दिवसात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या सिनेमातून असे काही कलाकार समोर आले. त्यांच्या कामाची तारीफही झाली. त्यामुळे गावातल्या कलाकारांना प्रचंड मागणी आली आहे. सिनेमावाले अशाच कलाकारांच्या शोधात फिरताना दिसतात. कुठरल्याही प्रोडक्शन हाउसला सिनेमा, मालिका, जाहिरात किंवा लघुपटात काम करण्यासाठी कलाकारांच्या ऑडिशन्स घ्यावा लागतात. या ऑडिशन्स घेण्यासाठी महामंडळाकडून रीतसर परवागीही घ्यावी लागते. गेल्या सहा महिन्यात महामंडाळात परवानगी मागणारे एकूण एकशेवीस अर्ज आले असून, यातल्या साठ टक्के ऑडिशन्स् या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये घेण्यात आल्या आहेत.

लातूर, उस्मानाबाद, बिड, परभणी, नागपूर, अकोला, बुलढाणा, नगर या अनेक ठिकाणी या ऑडिशन्स झाल्या. त्यातून काही चांगले कलाकार समोर आले आहे. गावाकडच्या कलाकारांमध्ये असणारे अभिनयाचे वेड, त्याच्यांत असणारी जिद्द् त्यांना पुढे घेऊन येते, असे निर्मात्यांचे म्हणने आहे. या कलाकारांकडून काम करुन घेणं सोपे असते, असे दिग्दर्शक सांगतात. फक्त मोठी शहरे नाही तर लोणार, खामगाव, घुलेवाडी, अशा अगदी छोट्या खेड्यांमध्ये ही काही सिनेमांसाठी ऑडिशन्स घेण्यात आले आहे. हे कलाकार कमी पैशात काम करायला तयार असतात त्यामुळे खर्चही कमी लागतो.

गावांमध्ये काळ असा होता की कलाकार कामांच्या शोधात पुणे- मुंबईत येत असतात. आता मात्र  दिग्दर्शक थेट ग्रामीण भागात जात आहे. शहरातल्या कलाकारांना ऑडिशन्स्बद्दल माहिती मीळते. त्यांना भरपूर संधी मीळते. पण गावाकडच्या मुलांमध्ये टॅलेंट असूनही त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचत नाही. आता एकांकी स्पर्धामुऴे अभिनयाचे वेड गावाकडे पोहोचले आहे. शिवाय अलिक़डे येऊन गेलेल्या काही सिनेमांमुळे हे टॅलेंट सिद्धही झाले आहे. त्याच्याकडून काम करुन घेणे सोपे असते. शिवाय आपण त्यांना जसे घडवू तसे घडत जातात. अशा अनेक कारणांमुळे निर्माते- दिग्दर्शक गावोगावी कलाकारांचा शोध घेत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin