Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


मुंबई महापालिकेत राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - महापालिका निवडणुकीत प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करु, असे सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुंबई महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावरच लढणार असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बुधवारी फेसबुकवरुन लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधला.

मनसेकडे जर युतीचा प्रस्ताव आला तर यावेळी विचार करेल. असे वक्तव्य मंगळवारी राज ठाकरे यांनी केले होते. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘मनसे स्वबळावरच लढणार, अद्याप मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आलेले नाही. त्यामुळे या सर्व चर्चांना सध्या तरी काहीही अर्थ नाही.’ 

 महापालिका निवडणूक, भाजप, शिवसेना, नोटाबंदी ते राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याच्या वादावर राज ठाकरे यांनी भाष्य केले.  शिवसेना-भजपची युती होण्याची शक्यता धुसर असताना ‘प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू’ असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र बुधवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज ठाकरेंनी स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. 

यावेळी राज म्हणाले की, ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी जावे, पक्षात अनेक जवळचे लोक आहेत. मी ट्रेलर दाखवत नाही, डायरेक्ट पिक्चर दाखवतो. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे मी काय करणार ते आताच सांगू शकत नाही. मनसेने आंदोलने केली म्हणूनच टोल नाक्यांचा प्रश्न मार्गी लागला. पण अद्याप काही टोलनाके सुरु आहेत. त्याबद्दल लोक मलाच प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे आता  राज्याची सत्ता माझ्या हाती देऊन पाहा,  असे पुन्हा एकदा राज ठाकरे म्हणाले. दहिहंडीबाबतही पहिल्यांदा मनसेनेच आवाज उठवला होता, असे सांगून राज ठाकरे यांनी निवडणुकींच्या तोंडावर पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin