Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राज्यातील शाळेत प्रत्येक सोमवारी वर्गात विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली आहे. त्यामुळे सेल्फीच्या सक्तीला स्थगिती मिळाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते, मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्यच असतात. देशातील १८ टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येतच नाहीत, असे निरीक्षण नोंदवले गेले. यावर तोडगा म्हणून बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच शिक्षण विभागाने नवी शक्कल लढवली होती. शिक्षकांना दर आठवड्याच्या सोमवारी मुलांबरोबर ‘सेल्फी’ काढून तो ‘सरल’ या प्रणालीवर अपलोड करावा लागणार होता. वर्गामधील हजेरी पडताळणीच्या या नव्या प्रकारामुळे जानेवारीपासून शाळांतील दर सोमवारचा पहिला तास हा ‘सेल्फी’चा ठरणार होता.

सेल्फीच्या माध्यमातून पटपडताळणी करण्याची योजना अमलात आल्यानंतर वर्गातील सर्व मुलांचे छायाचित्र पाठवायचे आहे. त्यानंतर दोन आठवड्यांनी ‘फक्त अनियमित राहणाऱ्या मुलांचे नाव आणि आधारक्रमांक ‘सेल्फी’ सोबत अपलोड करण्यात यावेत,’ असे या निर्णयात नमूद करण्यात आले. पण मुळातच अनियमित असणाऱ्या मुलांना कुठे शोधायचे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी कसा घ्यायचा?’ असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. राज्यातील शिक्षकांनी या निर्णयाचा तीव्र विरोध दर्शवला होता. शिक्षकांना या अशैक्षणिक कामातून वगळावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. अखेर या निर्णयाला विनोद तावडे यांनी स्थगिती दिली आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin