Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


बिर्याणी कमी वाढल्याने मजूर मित्राचा खून


Main News

सटाणा, दि.११ (पीसीबी) - आपल्या ताटात बिर्याणी कमी वाढली या कारणावरुन मित्रांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यावसन थेट हाणामारीत होऊन विहिरीवर काम करणाऱ्या मजूर विशाल याचा खून करण्याची घटना बागलाण ताकुक्यातील कऱ्हे शिवारात शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी दोघांना अटक केली असून, मुख्य आरोपी फरार आहे. मंगळवारी सटाणा न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

एकत्र काम करणाऱ्या साथीदारांनी दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचे बोलले जात असून, मजूराचा खून करुन त्याचा मृतदेह डोंगरावर फेकून देण्यात आला होता. सदर घटना वनविभागाचे कर्मचारी डोंगरावर गस्त घालत असताना उघडकीस आली. त्यांनी सटाणा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मालेगावचे अप्पर पोलिस अधिक्षक राकेश ओला, ग्रामीण उपविभागीय अधिकारी अशोक नखाते यांनी पोलिस ठाण्यात येऊन तपासाबाबत सूचना केल्या .

चौगाव येथील नानाजी रामभाऊ मांडवडे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरु होते. हे काम हरिभाऊ मुरलीधर वाघ या ठेकेदाराने घेतले होते. यासाठी पाच मजूर एकत्रित काम करीत होते. शनिवारी दुपारी कांतीलाल व विशाल यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. पुन्हा रात्री दारुच्या नशेत बिर्याणी वाढण्यावरुन वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

कांतीलालने विशालच्या डोक्यात, तोंडावर व गुप्तांगावर लोखंडी दांड्याचे घाव मारल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर कांतीलाल पळून गेला. तर उर्वरित बसराज व हरिभाऊ वाघ यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करुन बसराज व हरीभाऊ या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास निरीक्षक बशीर शेख हे करीत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin