Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


राज्यातील कारागृहामधून रजेवर सोडलेले ५७८ कैदी फरार


Main News

अमरावती, दि.११ (पीसीबी) – राज्यातील विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असताना संचित (पॅरोल) अभिवचन (फलरे) रजेवर सोडण्यात आलेले सुमारे ५७८ कैदी कारागृहांमध्ये परत न जाता पळून गेल्याचे समोर आले आहे. या फरार कैद्यांची माहिती कारागृह विभागाने  जाहीर केली आहे.

विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोल आणि फलरे, अशा दोन प्रकारच्या रजेवर सोडले जाते. यातील फलरे रजा ही प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. शिक्षेचा विशिष्ठ कालावधी पूर्ण केल्यावर त्याची वर्तणूक अणि स्थानिक पोलिसाचा अहवाल मागवून त्यांना ही रजा दिली जाते.  कारागृह महानिरिक्षक १४ दिवसांची संचित रजा देऊ शकतात. त्यात पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्याचा अधिकार त्यांना आहे. पॅरोल ही कैद्याची नातेवाईक आजारी असेल किंवा घरी कार्यक्रस असेल, तर ती विभागीय आयुक्तांकडून दिली जाते. मात्र कैदयास पॅरोल अर्ज सादर करावा लागतो. कारागृहातील त्याची वर्तणूक आदी पाहून त्यास ७ ते ३० दिवसापर्यंतची संचित रजा मंजूर केली जाते.

अमरावती मध्यवर्ती कारागृहातून संचित आणि अभिवचन रजा घेऊन पुन्हा न परतलेल्या १४८ कैद्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. यात हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे.  १९९६ ते २०१६ या कालावधित हे कैदी रजेवर गेले, ते पुन्हा  परतलेच नाही. अमरावती मध्यवर्ती कारागृहात सध्या १ हजार ७१ कैदी आहेत. त्यापैकी ५७७ कैदी विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यात ३५ महिलांचा समावेश आहे. ज्यांचे गुन्हे अद्याप सिद्ध झाले नाहीत, असे ४७१ कैदी आहेत. कैद्यापैकी १४८ कैदी अभिवचन व संचित रजा घेऊन परतलेच नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून १४० कैदी फरार घोषित करण्यात आले. त्यात परप्रांतातील २३ कैद्यांचा समावेश आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहातून १२३ कैदी रजेवर गेले होते. ते न परतल्याने त्यांना फरार घोषित करण्याचे आले आहे. औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातून ५७,  नागपूरक मध्यवर्ती कारागृहातून २५ आणि कोल्हापूर कारागृहातून ५२, येरवडा खुल्या कारगृहातून ३, मुंबई आणि रत्नागिरी विशेष कारागृहातून २, पैठण खुल्या कारागृहातून एका कैद्याला फरार घोषित करण्यात आले आहे. या कैद्यांना हूडकून काढण्याचे आव्हान आता पोलिस यंत्रणेसमोर आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin