Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल आज वाजणार


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी)  - मुंबई, ठाणेसह राज्यातील १० महत्त्वाच्या महापालिकांमधील निवडणुकीचा कार्यक्रम आज दुपारी जाहीर होणार आहे. चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत १० महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्येच निवडणुका होतील, अशी  माहिती  निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी यापूर्वीच दिली आहे.

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या १० महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे.  महापालिकेसोबत २६ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचा कार्यक्रमही आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणा, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे.

मार्चमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा असल्याने महापालिका निवडणुका फेब्रुवारीतच घेतल्या जातील. त्याची तयारी सुरू असून प्रशासकीय अधिकारी, महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज.स. सहारिया यांनी रविवारी सांगितले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin