Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


युतीसाठी भाजपचे पहिले पाऊल; जागांचा प्रस्ताव शिवसेनेला देणार


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राज्यातील सत्तेत एकत्र असूनही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परस्परांवर शरसंधान करणारे शिवसेना आणि भाजप यांनी युती करण्यासंदर्भात प्राथमिक बोलणी करण्याचे ठरविले आहे. मुंबई महापालिकेसाठी किती जागा हव्या आहेत, याबाबतचा प्रस्ताव एक-दोन दिवसांत शिवसेनेकडे पाठवण्याचे भाजपने ठरवले असून, त्यानंतर प्रत्यक्ष बोलणी सुरू होतील, असे सांगण्यात आले. तर,युतीबाबतचा निर्णय काय तो लवकरात लवकर घ्या, असा प्रतिसाद शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे वरिष्ठ मंत्री आणि नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावर घेतली. त्यावेळी राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून दहा महापालिका आणि २७ जिल्हा परिषदांमधील सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती घेण्यात आली. स्वबळावर लढावे की शिवसेनेसोबत युती करावी, याबाबतची त्यांची मते जाणून घेण्यात आली.

मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिका आहे. मुंबईचे भाजप अध्यक्ष आशीष शेलार आणि भाजपच्या काही मंत्र्यांनी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची अलीकडेच भेटही घेतली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावरच लढविली तरच भाजपच्या जागा वाढतील, अशी भूमिका या नेत्यांनी शहा यांच्याकडे मांडली आहे. मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती भाजपसाठी अनुकूल असून, या स्थितीत शिवसेनेविरोधात लढून जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचे भाजपच्या या नेत्यांना वाटत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत युती करण्याबाबत अनुकूल आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनेला सोबत घेण्याबाबतही त्यांनीच पुढाकार घेतला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीतही सेनेसोबत युतीची भूमिका मांडली.

दरम्यान, मुंबईत किती जागांची मागणी करायची याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्याशी चर्चा करून घेणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपची मुंबईसह राज्यात ताकद वाढलेली आहे. त्या प्रमाणात जागांची मागणी सेनेकडे केली जाणार असून, ती शंभरहून अधिक जागांची असेल, असे सांगण्यात येते. युतीसंदर्भात भाजप-शिवसेनेची नेतेमंडळी प्राथमिक चर्चा करतील. जागांबाबत बोलणी यशस्वी झाल्यानंतर युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उध्दव ठाकरे हे घेणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले.

राज्यातील सत्तेत एकत्र असतानाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परस्परांवर शरसंधान करणारे शिवसेना आणि भाजप यांनी युती करण्यासंदर्भात प्राथमिक बोलणी करण्याचे ठरविले आहे. मात्र, शिवसेनेने भाजपला अपेक्षित जागा न दिल्यास युती होणार नाही आणि भाजप मुंबईसह राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढेल. भाजपसोबत आठवले यांचा आरपीआय असेल, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

दरम्यान, मुंबई महापालिकेत भाजप किती जागांची मागणी करतो त्यावर युतीचे भवितव्य ठरणार असून भाजपने अवाजवी जागा मागितल्यास युती होणार नाही. विधानसभा निवडणुकीतील अनुभव आमच्या गाठीशी आहे. त्यामुळे आम्ही महापालिकेसाठी आधीपासून स्वबळावर लढण्याबाबत तयारी केली आहे. युती व्हावी अशी उध्दव ठाकरे यांचीही इच्छा आहे, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. भाजप रामदास आठवले यांच्या आरपीआयशी युती करणार असेल तर शिवसेना अर्जुन डांगळे यांच्या गटाशी युती करेल, असेही सांगण्यात आले.

१०५ पेक्षा कमी जागा नकोत

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करताना १०५ पेक्षा कमी जागा घेऊ नका, अशी सक्त सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप नेत्यांना केली आहे. शिवसेना नेतृत्व याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin