Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


धुळ्यातील व्यापाराला २३ लाखाचा गंडा


Main News

धुळे, दि. १० (पीसीबी) - संगमनेर येथील साखर कारखान्यातून साखरेची पोती भरुन आणलेल्या ट्रकची परस्पर विल्हेवाट लावून व्यापाऱ्यास तब्बल २३ लाखाचा गंडा घातल्याची घटना धुळे येथे घडली आहे. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यात सावळे गावात राहणाऱ्या दोघाविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर येथील भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्यातून ज्ञानेश्वर युवराज नगराळे व सोनु खंडू नगराळे हे दोघे ट्रकमध्ये २१ टन साखरेची सुमारे ४२० पोती भरुन निघाले होते. शिरपूर येथील गोपाल अग्रवाल या व्यापाऱ्याकडे ते हा ट्रक पोहोचवणार होते. मात्र शिरपूर येथे ही पोती न आणता त्यांनी ट्रकसह या मालाची परस्पर विल्हेवाट लावली. 

साखर कारखान्यातून हा ट्रक निघाला मात्र तो संबंधित व्यापाऱ्याकडे पोहचला नसल्याचे कळताच धुळ्यातील कापड व्यापारी आणि मालेगावचे रहिवाशी सुनिल मुकेश कालडा यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यावरुन १६ लाखाचा ट्रक आणि ७ लाख ८० हजाराची साखर असा एकूण २३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी  सोनु खंडू नगराळेला रात्री उशीरा अटक केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin