Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


मुंबई महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेचा भाजपला ‘अल्टिमेटम’


Main News

मुंबई, दि.१० (पीसीबी) - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधी युतीचा निर्णय घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान भाजपकडून युतीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे समजते.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तर युती होईल की नाही, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात दोन्ही पक्षांतील काही नेते स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे शिवसेनेने सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे समजते. वरिष्ठ पातळीवरून जातीने त्यात लक्ष घातले जात आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप हा अव्वल स्थानी असल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. पण मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढणे जोखमीचे असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याची चर्चा आहे. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी आग्रही आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येते. 

येत्या दोन दिवसांत महापालिका निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर युतीबाबतचा निर्णय घ्यावा, असे सांगून ठाकरे यांनी भाजपला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत युतीसाठी पहिली ‘टाळी’ कोण देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin