Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


बहुजन क्रांती मोर्चाही राजकीय रिंगणात!


Main News

नाशिक, दि.१० (पीसीबी) - मराठा क्रांती मोर्चाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर बहुजन क्रांती आघाडी या नावाने पक्षाची नोंदणी केली आहे. या आघाडीने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकासांठी शरद तायडे(नाशिक) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही स्वबळावर लढण्याची भूमिका आजच्या बैठकीत घेण्यात आली.

मराठा क्रांती मुक मोर्चातून अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्तीची मागणी पुढे आल्यानंतर विविध समाजातील संघटनांनी एकत्र येत मराठा क्रांती मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिला मोर्चा २४ ऑक्टोबरला नगरमध्ये काढला गेला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर  बहुजन क्रांती मोर्चाच्या संयोजकांनीही राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक अशोक गायकवाड, प्रा.किसन चव्हान, शिवाजी ढवळे, संतोष रोहम, विजय वाकचौरे, अशोक अल्हट, दिपक पाटील, सुरेश वाघ आदी बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत या संयोजकांनी बहुजन क्रांती आघाडी नावाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली जाणार असल्याची तसेच त्यासाठी राज्य निवडणुक आयोगाकडे येत्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणार करणार असल्याचे व पक्षचिन्ह निवडणार असल्याची माहिती दिली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin