Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू - राज ठाकरे


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) - युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार केला जाईल, असे   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांनी हे वक्तव्य केल्याने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मात्र राज कोणाबरोबर युती करण्यास इच्छुक आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज शिवसेनेबरोबर युती करणार का? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.   

यापूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले, मात्र शिवसेना आणि मनसेच्या प्रमुखाने यावर काहीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगणे पसंत केले होते. दरम्यान राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपनेही वेळोवेळी प्रयत्न केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने मनसेशी युती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी युती झाली नव्हती.

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर मी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. उद्धवशी तसे बोलणेही झाले होते. त्यासाठी अर्जवाटपही थांबवले. पण त्यानंतर उद्धवने प्रतिसादच दिला नाही. साधा फोनही केला नाही. त्यामुळेच सगळे फिसकटले,’ असा खळबळजनक गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. 

यावर ज्यांना माझ्या फोनची अपेक्षा आहे, त्यांनी मला मेसेज किंवा कॉल करा, मी त्यांना रिप्लाय देईन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटले होते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin