Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


पोलिसांचा ब्रँड अँम्बेसिडर व्हायला आवडेल- अमिताभ बच्चन


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) - माझा आवाज आणि चेहरा जर पोलिस खात्यात उपयोगी पडू शकत असेल तर वाहतूक पोलिसांचा ब्रँड अँम्बेसिडर व्हायला आवडेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.

मी माझा चेहरा आणि आवाजाने मॅगी विकू शकतो, गुजरात टुरिझमची जाहिरात करु शकतो, तर वाहतुकीविषयी नागरिकांना योग्य मार्गदशनही करु शकतो. माझा आवाज आणि चेहरा  पोलिस खात्याला उपयोगी पडू शकत असेल, तर मला वाहतूक पोलिसांचा बँड अँम्बेसिडर व्हायला आवडेल. याबाबत मी वेळोवळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली आहे. वाहतूक पोलिसांच्या सुरक्षा सप्ताहाच्या लघुपटांमध्ये नागरिकांना रस्ते सुरक्षाबाबत आवाहन करण्यास मी तयार आहे, असे बच्चन म्हणाले. त्यांनी यावेळी पोलिसांच्या कार्यप्रणालीचे कौतुकही केले.

यावेळी बच्चन यांनी वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयाला भेट देऊन अत्याधुनिक वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाची पाहणी केली. वाहतूक पोलिसांचे नव्याने सुरु झालेले अँप मोबाईलवर डाऊनलोड करुन समजावून घेतले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यसचिव स्वाधिन क्षत्रिय पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर, सह आयुक्त पोलिस मिलिंद भारंबेसह आदी याप्रसंगी उपस्थित होते.

राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर  सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. त्यामध्ये १८ ते ३० वयोगटातील मृत्युचे प्रमाण लक्षणीय आहे. राज्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजप्रबोधन करून रस्ता सुरक्षेचे महत्व नागरिकांना कळावे. यासाठी राज्यभर रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे, असे भारंबे यांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin