Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


अकरावी प्रवेश होणार सुटसुटीत


Main News

मुंबई, दि.१० (पीसीबी)- अकरवी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचा गोंधळ थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने ठोस पाऊले उचलली असून ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. नव्या प्रवेश प्रक्रियेत ५० कॉलेजांचा पसंतीक्रम भरण्यापासून विद्यार्थ्यांची सुटका झाली असून, त्यांना आता फक्त दहा कॉलेजांसाठीच पसंतीक्रम भरावा लागणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या फेरीपासून पसंतीक्रम बदलण्याची मुभाही देण्यात आली आहे.
 
अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसुत्रता आणण्याबाबत मुंबई-पुण्यातील उपसंचालकांनी काही दिवसांपुर्वी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी ठराविक मुख्याध्यपक व प्राचार्यांची बैठक नुकतीच आयोजित करुन अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. तो सोमवारी सरकार निर्णयाव्दारे (जीआर) जाहीर करण्यात आला.
 
अकरावी ऑनलाईन प्रकिया सध्या फक्त मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या शहरांसाठी आहे. ती आता येत्या शैक्षणिक वर्षापासून नागपूर, अमरावती, नाशिक, आणि औरंगाबाद या शहरांसाठी लागू होणार आहे.
 
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रिडा गुणांबरोबरच आता शास्त्रीय कला, चित्रकला, आणि लोककला प्रकारातील प्रावीण्यसाठी ५ ते १५ वाढीव गुण मिळणार आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin