Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


बुलेट ट्रेन तोडण्यासाठी नाही, मुंबईला देशाशी जोडण्यासाठी - शेलार


Main News

मुंबई, दि.१० (पीसीबी) –  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची हाकाटी कालच एका नेत्याने केली आहे. विकासाच्या प्रत्येक कामांवर या नेत्याची हीच प्रतिक्रिया असते. मुंबई- नागपूर समृदधी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हे सर्व मुंबईला जगाशी जोडण्याचे प्रयत्न आहेत. भाजप हा प्रयत्न करतो मग तुमच्या पोटात का दुखते, अशा शेलक्या शब्दांमध्ये राज ठाकरे यांचे नाव न घेता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष् शेलार यांनी पलटवार केला.

लालबाग येथे झालेल्या छोटेखानी सभेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.

‘ती सध्या काय करते,’ अशी टॅगलाईन घेत शेलार यांनी शिवसेनेच्या सर्वच निर्णयावर खरपूस टीका केली. ती सध्या काय करते, असे सांगत भाजपने आणलेल्या एलईडी दिव्यांच्या प्रस्तावाला विरोध, उन्नत रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला विरोध, भाजपच्या मेट्रो प्रकल्पांना विरोध, किणारा मार्गाला विरोध, अशी जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. 

एकेकाळी युवासेनाच्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावर मुंबईत फिरणारे युवा नेते आता त्याच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत आहे. पण ‘नया है वह’ असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही वाग्बाण सोडले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin