Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


राष्ट्रवादीच्या आमदाराची बँकेच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ; पोलिसांत गुन्हा दाखल


Main News

सेलू, दि. १० (पीसीबी) - सेलू येथील देना बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक गौतम घोडके यांना बँकेच्या शाखेत जाऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांच्यावर सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेत जबरीने घुसून शासकीय कामात अडथळा करून शिवीगाळ केल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भांबळे यांच्या निषेधार्थ सोमवारी दिवसभर बँकेचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. यात खातेदारांची मोठी गैरसोय झाली.

आमदार भांबळे यांनी शनिवारी बँकेच्या शाखेत जावून व्यवस्थापक गौतम घोडके यांना शिवीगाळ केली, अशी तक्रार घोडके यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशासनाकडे केली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर सोमवारी बँकेच्या व्यवस्थापनाने काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे फलकही बँक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दर्शनी भागात लावले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून बँकेचे कामकाज बंदच ठेवण्यात आले. नागपूर येथील देना बँकेच्या विभागीय कार्यालयाकडून कायदेशिरदृष्टया परवानगी मिळाल्यानंतर शाखा व्यवस्थापकासह सर्व कर्मचाऱ्यांनी सेलू पोलिस ठाण्यात जावून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. देना बँकेचे शाखा व्यवस्थापक गौतम घोडके यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात आमदार भांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin