Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


आता मुंबईत शौचालय शोधण्यासाठी अॅप विकसित


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - घराबाहेर पडल्यानंतर अचानक नैसर्गिक विधीसाठी जायचे असल्यास सार्वजनिक शौचालय शोधायचे कुठे, हा प्रश्न आता निकालात निघाला आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी ‘मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप’ विकसित केले आहे. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी या अॅपचे उदघाटन केले.

जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला दररोज हजारो पर्यटक आणि नागरिक भेट देत असतात. तसेच लाखो मुंबईकरही कामानिमित्त घराबाहेर पडत असतात. या सर्वांना नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक शौचालयांची गरज भासते. मात्र अशावेळी संबंधित भागातील जवळचे शौचालय शोधणे त्रासदायक ठरत असे. या अॅपमुळे हे काम आता सोपे होणार आहे.

हे अॅप अॅण्ड्रॉइडवर गुगल प्ले स्टोअरमध्ये मोफत उपलब्ध आहे. मुंबईतील ८०० सशुल्क शौचालये याला जोडण्यात आली असून, इतरही शौचालये अॅपला जोडण्याची कार्यवाही सुरू आहे. आपण असू त्या भागातील जवळचे शौचालय, तिथे जाण्याचा मार्ग व आपण असलेल्या ठिकाणापासूनचे अंतर जीपीएसच्या सहाय्याने अॅपवर दर्शविले जाणार आहे. अॅपशी जोडलेल्या प्रत्येक शौचालयाचे छायाचित्र अॅपवर दिसणार असून, त्यामुळे शौचालय शोधण्यास मदत होणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin