Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


भाजपकडे ७१ नगराध्यक्ष व दोन हजारांवर नगरसेवक; राज्यात भाजपचाच क्रमांक पहिला


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) - राज्यातील चारही टप्प्यांतील २१० नगर परिषद, नगर पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्या. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या आघाड्यांवर भाजपने पहिला क्रमांक पटकावून राज्यात आपले नंबर वन स्थान पक्के केले आहे. नगराध्यक्षांच्या एकूण जागांपैकी ३७ टक्के, तर नगरसेवकांच्या एकूण जागांपैकी ४४ टक्के जागा जिंकून भाजपने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या दोन्ही आघाडीवर काँग्रेसने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

राज्यात नगराध्यक्षांच्या १९१ जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी भाजपने ७१ जागा जिंकल्या असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागांच्या बेरजेपेक्षा अधिक या जागा आहेत. पक्षनिहाय विजयी नगराध्यक्षांच्या संख्येचा विचार केला तर भाजपनंतर काँग्रेसने दुसरा, तर शिवसेनेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसने नगराध्यक्षाच्या ३४, शिवसेनेने २६, तर राष्ट्रवादीने २२ जागा जिंकल्या.

राज्यातील १९१ नगर परिषदा आणि १९ नगरपंचायती मिळून २१० ठिकाणी २६ नोव्हेंबर १६ ते ८ जानेवारी १७ दरम्यान चार टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या. यापैकी केवळ तिसऱ्या टप्प्यात काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक नगरसेवक जिंकून पहिला क्रमांक पटकावला होता. यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील यशाचा मोठा वाटा होता. उर्वरित तिन्ही टप्प्यांत भाजपच अव्वल ठरला. विदर्भ हा भाजपचा आता बालेकिल्ला असल्याने येथील सर्वच विभागात भाजपने ५० ते ८० टक्के जागा जिंकल्या आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयावर मतदारांकडून शिक्कामोर्तबच - रावसाहेब दानवे
नगर पालिका निवडणुकीच्या चारही टप्प्यात मतदारांनी भाजपला भरघोस यश दिले आहे. हा ऐतिहासिक विजय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जनतेने शिक्कामोर्तबच केले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘चारही टप्प्यांचे निकाल बाहेर आल्यानंतर राज्यात भाजपच नंबर वन पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. मोदी व फडणवीस सरकारच्या कारभारला या माध्यमातून जनतेने पसंती दिली आहे. भाजपचे पक्षाच्या चिन्हावर ७२ नगर पालिकांत वर्चस्व असून इतर पाच ठिकाणी मित्रपक्षांच्या मदतीने आमचीच सत्ता आहे,’ असेही दानवे म्हणाले. या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांच उत्साह द्विगुणीत झाल्याचेही ते म्हणाले.

मनसेपेक्षा बसपची कामगिरी सरस
राज्यात ४ हजार ७०४ जागांपैकी ७ जागांवर मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या मनसेचे उमेदवार विजयी झाले. मायावती अध्यक्ष असलेल्या बसपचे १७ उमेदवार निवडून आले. राज्यात कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर लढण्याऐवजी स्वबळावर लढण्याला प्राधान्य देणाऱ्या ५७१ उमेदवारांनी विजय प्राप्त केला.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin