Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


संभाजी ब्रिगेडची धमकी; शिवसेना भवनावरील ठाकरेंच चित्र हटवावे


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) - नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा उखडून टाकण्याचे प्रकरण ताजे असतानाच संभाजी ब्रिगेडने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रांवर आक्षेप घेतला आहे. दादरच्या ऐतिहासिक शिवसेना भवनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे असलेले चित्र हटवा, नाहीतर ब्रिगेड आपल्या पद्धतीने ते चित्र काढून टाकेल, अशी धमकी संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम शिवरायांच्या नावाचा वापर करत राजकारण केले. मुस्लिम आणि मराठ्यांमध्ये दंगली पसरवल्या. आता शिवसेना शिवरायांपेक्षा बाळासाहेबांना मोठे समजू लागली आहे. त्यामुळेच शिवसेना भवनावर छत्रपती शिवराय छोटे आणि बाळासाहेब मोठे दाखवण्यात आले आहे. शिवसेनेने शिवरायांची ही केलेली बदनामीच आहे, असा आरोप आखरे यांनी केला. सेना भवनावरील बाळासाहेबांचे चित्र काढण्यात यावे, त्याबाबतचे निवेदन ब्रिगेडने मुंबई पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री आदींना दिले आहे. या कारवाईबाबत आम्ही काही काळ वाट पाहणार आहोत. त्यानंतरही आमच्या मागणीचा विचार केला नाही, तर ब्रिगेड पद्धतीने आम्ही बाळासाहेबांचे चित्र हटवू, असे आखरे यांनी सांगितले. 

संभाजी ब्रिगेडमध्ये फूट
‘संभाजी ब्रिगेड’ संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड १२ जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणार आहेत. ब्रिगेडने नुकतीच स्वत: राजकीय पक्षाची स्थापना केली असताना गायकवाड यांचे हजारो कार्यकर्त्यांसह ‘शेकाप’मध्ये दाखल होणे, ब्रिगेडमध्ये उभी फूट पडल्याचे समजण्यात येत आहे.

गायकवाड यांच्या प्रवेशाची घोषणा ‘शेकाप’ सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. इतके दिवस ‘शेकाप’मधून आऊटगोईंग होत होते, आता इनकमिंग सुरू झाले आहे. गायकवाड यांच्या प्रवेशाची प्रक्रिया तीन वर्षे सुरू होती. येत्या १२ जानेवारी रोजी पुण्यातील शनिवारवाड्यावर प्रवेशाचा समारंभ होणार आहे. त्यामध्ये ‘रासप’, राष्ट्रवादी, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आदी पक्षातील गायकवाड यांना मानणारे हजारो कार्यकर्ते ‘शेकाप’मध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी पत्रकारांना दिली.

मुंबईत मराठा मोर्चा काढू नये : गायकवाड
‘आजपर्यंत राज्यात ४४ मराठा मोर्चे काढण्यात आले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना २० मागण्यांची निवेदने देऊन झाली. नागपुरात राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला. परत मुंबईत मोर्चा काढण्याची गरज आपल्याला वाटत नाही. त्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात यावा’, असे प्रवीण गायकवाड म्हणाले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin