Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


राणीच्या बागेतील बांधकाम करणाऱ्या कंपनीशी आदित्य ठाकरेचे लागेबांधे - नितेश राणे


Main News

मुंबई, दि. ९ (पीसीबी) - राणीच्या बागेतील पेंग्विन पिंजर्‍याचे बांधकाम व द. कोरियातून पेंग्विन आणणाऱ्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक तन्मय शाह यांच्याशी आदित्य ठाकरे याचे लागेबांधे आहेत, असा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेंग्विनच्या पिंजऱ्याच्या होऊ घातलेल्या उद्घाटनालाही त्यांनी विरोध केला आहे.

नितेश यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे  पेंग्विन प्रदश॔न काय॔कम रद्द करण्याची मागणी केली आहे. शहरात येऊन पाच महिने लोटलेल्या पेंग्विनचे अखेर सामान्यांना दर्शन होण्याची वेळ महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. त्यातच पेंग्विन पाहण्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने फेटाळला आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत हे पेंग्विन मोफत पाहता येणार आहेत. 

पालिका प्रशासनाकडून आचारसंहितेच्या काळात पेंग्विनच्या पिंजऱ्याचे उद्‌घाटन केले जाण्याची शक्यता आहे. या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळेच नितेश यांनी या उद्घाटनाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नितेश राणे आणि शिवसेना यांच्यात ‘सामना’ रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin