Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

उन्हाळ्यात आरोग्याची आशी घ्या काळजी


Main News

वातावरणातील बदल आणि तापमानात गेल्या काही आठवड्यापासून वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीचे तापमानही वाढल्याने थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी टरबूज, खरबूज, द्राक्ष, काकडी इ. विविध फळ खाल्ली जातात. यामधील आणखी एक महत्त्वाचे फळ म्हणजे चिकू. उन्हाळ्यात याचे दररोज सेवन केल्यास आरोग्यदायी लाभ होतात.

चिकू गोड, थंड भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकारचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो. चिकूची साल तापनाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते.

1. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची शक्ती वाढते. चिकूमध्ये ग्लुकोजची मात्राही चांगली असते. जे लोक जास्त काम करतात त्यांना ऊर्जेची जास्त आवश्यता असते. अशा लोकांनी चिकूचे नियमित सेवन करावे.

2. चिकूमध्ये जास्त प्रमाणत फायबर आढळते. गर्भावस्थेमध्ये लाभदायक कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्त्वांची चांगली मात्रा प्राप्त करण्यासाठी चिकू लाभदायक आहे. प्रसूतीनंतर अंगावर जास्त प्रमाणात दूध येण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.

3. चिकूमध्ये ७१ टक्के पाणी. १.५ टक्के प्रोटीन आणि २५.५ टक्के कार्बोहायड्रेट असते. यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात तर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. या फळामध्ये १४ टक्के शर्करा असते तसेच यामध्ये फॉस्फरस आणि लोह असते.

4. हाडांसाठी चिकू खूप फायदेशीर आहे. चिकूमध्ये फॉस्फरस आणि आयर्नचे अतिरिक्त प्रमाण असते, जे हाडांसाठी खूप आवश्यक आहे. कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरसची चांगली मात्रा असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी चिकू लाभदायक
आहे.

5. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामध्ये अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुण पॉलिफेनॉलिक अँटीऑक्सिडन्ट घटक आहे. यामधील अँटीऑक्सिडन्ट घटक शरीरातील विषाणूंना नष्ट करतात. पोटॅशियम, आयर्न, फॉलेट, आणि नियासिन हे घटक पचनक्रियेला स्वस्थ ठेवतात.

6. चिकूमध्ये व्हिटॅमिन ई आढळते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमची त्वचा स्वस्थ आणि सुंदर होईल. चिकूच्या बियांचे तेल केस वाढीसाठी फायदेशीर ठरते.

7. चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.

8. कफाचा त्रास असेल तर चिकूचे सेवन फायदेशीर ठरते. चिकूमध्ये खास तत्त्व आढळतात जे श्वसन मार्गातील अडथळे दूर करतात आणि खोकल्यापासून आराम मिळतो. सर्दीमध्येही चिकू प्रभावी उपाय आहे.

9. मानसिक स्वास्थ्य आणि डोकं शांत ठेवण्यासाठी चिकू उपयुक्त फळ आहे. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. अनिद्रा, चिंता आणि तणाव पीडित लोकांनी चिकूचे नियमित सेवनाने आराम मिळतो.

10. चिकूमधील पॉलिफेनॉलिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब अशा आजारात आराम मिळतो.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin