Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

जमिनीवर बसून जेवण्याचे 5 फायदे!


Main News

- पाटावर किंवा जमिनीवर बसून जेवणाची पद्धत खेडेगावांपुरतीच मर्यादित राहिली आहे. मेट्रोपोलिटन किंवा अगदी छोट्य-छोट्या शहरांमध्येही आता डायनिंग टेबल वगैरे आले आहेत. मात्र, आज तुम्हाला आम्ही जमिनीवर बसून जेवणाचे फायदे सांगणार आहोत. मग तुम्हीही आठवड्यातील किमान एक दिवस तरी जमिनीवर बसून जेवाल, हे नक्की.

१) बसून जेवणाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे बसल्याने पाठ, कंबर आणि पोटाजवळील स्नायूंवर ताण येऊन पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. त्यामुळे अन्नपचनास सुलभता येते. शिवाय, शरीर लवचिक बनण्यासही मदत होते.

 २) जमिनीवर बसून जेवल्यास अर्धपद्मासनाची स्थितीत आपण असतो. त्यात ताट जमिनीवर असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी वाकावं लागतं. त्यामुळे सतत होणारी शारीरिक हालचाल पोटाजवळील स्नायूंना चालना देते. पर्यायाने पचनक्रीया सुधारते.

 ३) अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला अधिक उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

 ४) सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, घरातल्या सर्वांसोबत जमिनीवर बसून जेवल्यास दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास  मदत होते व नकळत कुटूंबातील सर्वांशी जवळीक वाढते.

 ५) जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin