Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

ग्रीन टीचा प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम


Main News

 - हल्ली फिट राहण्यासाठी ग्रीन टी प्याली जाते. मात्र, हीच ग्रीन टी तुमच्या शरीराला हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. ग्रीन टीचा दुष्परिणाम प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.

साधारणत: ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक मानली जाते. मात्र, एका नव्या संशोधनानुसार असं समोर आलं आहे की, सातत्याने ग्रीन टी प्यायल्यास प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतात.कॅलिफोर्निया-इरविन यूनिव्हर्सिटीच्या एका टीमने फळांवरील माशांचं परीक्षण केलं. या परीक्षणातून असं निदर्शनास आलं की, ग्रीन टीच्या सेवनामुळे त्यांचा शारीरीक विकास आणि प्रजनन क्षमता यांच्यावर दुष्परिणाम होऊ लागले.

शस्त्रज्ञांच्या माहितीनुसार, “ग्रीन टीची वाढती लोकप्रियता लक्षात घेता ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ग्रीन टी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक उत्पादकांचं प्रमाणापेक्षा अधिक सेवन हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.”
 फार्मास्युटिकल सायंसेजचे प्राध्यापक महताब जाफरी यांनी माहिती दिली की, “ग्रीन टीचं योग्य प्रमाणात प्यायल्यास आरोग्याला अनुकूल, तर प्रमाणापेक्षा अधिक प्यायल्यास शरीराला घातक ठरण्याची शक्यता आहे.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin