Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

हिवाळ्यातील कोरड्या त्वचेपासून असा करा बचाव ...!


Main News

गुलाबी थंडीचा हिवाळा कितीही आनंददायी आणि मोहक असला तरी त्याचा सर्वात विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्वचा कोरडी पडणं, ती काळी पडणं, त्वचा फुटणं, खरखरीत होणं, त्वचेला खाज सुटणं असे प्रकार होतात. हिवाळ्यात आपली त्वचा कायम सुंदर, मुलायम राखण सोपं असून त्यासाठी काही उपाय नित्य नियमाने करणे गरजेचे आहे.  

भरपूर पाणी प्या
हिवाळ्यात आपल्याला तहान कमी लागते. त्यामुळे आपण पाणी कमी पितो. पण असं करू नये. कारण, कमी पाणी प्यायलामुळे त्वचेला सुरकुत्या येऊ शकतात. हिवाळ्यात नेहमीप्रमाणे किमान आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं. या दिवसांत ग्रीन टी त्वचेसाठी उत्तम असते. या दिवसात भरपूरवेळा पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार आणि ताजीतवानी दिसते. तसंच हिवाळ्यात कितीही थंडी असली तरी अंघोळीसाठी किंवा चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. पाणी साधं किंवा कोमट असावं. गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल संपतं आणि अशात साबण किंवा फेसवॉशचा वारंवार वापर केल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा निघून जातो. परिणामी संपूर्ण त्वचा रूक्ष होते.

मॉश्चरायझर गरजेचे
हिवाळ्यात हवेतील मॉश्चरायझर कमी होतं. त्यामुळे त्वचा रखरखीत होण्याची, कोरडी पडण्याची दाट शक्यता असते. अशावेळी हिवाळ्यात त्वचेला मऊसूत ठेवण्यासाठी अंघोळ झाल्यानंतर आणि दिवसातून २ ते ३ वेळा आपल्या संपूर्ण त्वचेला हलक्या हाताने मॉश्चरायझर लावा. अंघोळीच्यावेळी मॉश्चरायझिंग शॉवर जेलने अंघोळ केल्यास त्वचेतील ओलसरपणा टिकून राहतो. नारळाचा समावेश असलेले मॉश्चरायझर हे त्वचेसाठी चांगलं असतं. हिवाळ्यात ओठांवरही वाईट परिणाम होतो. ओठ फाटू लागतात आणि म्हणून ओठांची काळजी घेण्यासाठी लिपबाम किंवा व्हॅसलिनचा वापर करता येऊ शकतो. 

आहारकडे लक्ष द्या
हिवाळ्यात आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळं, शहाळाचं पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करावा. हिवाळ्यात शरीरात प्रोटिनची मात्रा कमी होते. ही मात्रा  संतुलित राहण्यासाठी मासांहार करणं उपयुक्त ठरतं. अंडी, कडधान्य, शेंगदाणे असे प्रोटिन देणारे पदार्थही हिवाळ्यात खाणं त्वचेसाठी फायदेशीर आहे. संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे त्वचेचं आरोग्य नीट राहतं. त्याचबरोबर हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणं उपयुक्त आहे.

घरगुती उपाय
थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. लिंबाचा रस आणि मधाचे मिश्रण चेहऱ्याला लावून दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुणं आणि रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी, ग्लिसरीन याचं मिश्रण लावल्यास हात-पाय मुलायम आणि चमकदार होतात. ओठांवर कोमट केलेल्या तुपाचे बोट फिरवा अथवा दुधाची साय लावा.  थोडीशी हळद घातलेली साय मॉश्चरायझर म्हणून रात्री झोपताना अथवा अंगोळीपूर्वी किमान अर्धा तास अंगाला लावून कोमट पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम तजेलदार होईल त्याचबरोबर वर्णही काही अंशी उजळेल. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin