Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

पासवर्ड, पिन हा "कॅशलेस' व्यवहाराचा महत्त्वाचा मुद्दा


Main News

- पासवर्ड, पिन हा आज-उद्याच्या "कॅशलेस' जगाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल. या गोष्टी गोपनीय ठेवायच्या असतात, हेच बऱ्याच जणांना माहीत नसते. यामुळे सहजपणे ते आपले पासवर्ड तसेच पिन इतरांना सांगतात. आजच्या जवळपास प्रत्येक व्यवहाराच्या वेळी आपल्याला पासवर्ड किंवा पिन लागतोच. उदाहरणार्थ, आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून दुकानात खरेदी केली किंवा पेट्रोल भरले, तर तिथल्या माणसाने आपले कार्ड त्याच्याकडच्या यंत्रामध्ये "स्वाइप' केल्यानंतर आपल्याला आपला "पिन' भरावा लागतो. अनेकदा लोक आपला "पिन' सरळ त्या माणसालाच सांगतात आणि तो माणूस आपल्या वतीने त्या यंत्रात आपला "पिन' भरतो.

हे अत्यंत धोकादायक आहे. याचे कारण म्हणजे आपल्या कार्डावरचे तपशील अशा ठिकाणी काम करणारा चाणाक्ष माणूस लक्षात ठेवू शकतो. याच्या जोडीला आपण आपला "पिन'ही त्याला सांगितला, तर आपल्या कार्डाची सुरक्षितता पूर्णपणे नष्ट होऊ शकते. तो माणूस या सर्व माहितीच्या आधारे आपल्या कार्डाचा गैरवापर करू शकतो. हाच प्रकार फोनवरूनही घडतो. सर्वसामान्य लोकांना भामटे फोन करून त्यांच्याकडून एटीएम किंवा डेबिट वा क्रेडिट कार्डांचे तपशील, पिन, मोबाईलवर येणारे वन टाइम पासवर्ड (ओटीपी) अशी माहिती घेतात. यासाठी आपण बॅंकेचा अधिकारी असल्याची बतावणी ते करतात; किंवा फोनवरून पलीकडच्या माणसाला कसले तरी बक्षीस लागले असल्याची आणि त्यासाठी ही माहिती आवश्‍यक असल्याची थाप मारतात.

लोक भीती किंवा हाव यापोटी ही माहिती सहजपणे देतात. आपला पासवर्ड, पिन आणि ओटीपी कधीही, कोणालाही सांगू किंवा दाखवू नका आणि मग "कॅशलेस' व्यवहार बिनधोकपणे करा! 

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin