Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

अर्धवट झोपेमुळे हृदयविकाराचा धोका


Main News

- दिवसाची सुरुवात लवकर करताना शरीरासाठी जेवढी झोप आवश्यक आहे, ती पूर्ण होणेही तितकेच गरजेचे आहे. नाहीतर अर्धवट झोपेमुळे हृदयविकाराचा धोका संभवू शकतो, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून समोर आला आहे.

आप्तकालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारे, कॉल सेंटर्समध्ये काम करणारे आणि अशा पद्धतीच्या इतर तणावपूर्ण स्वरुपाची नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्धवट झोप मिळते. त्यामुळे त्यांच्या हृदयावर ताण येण्याचा धोका सर्वाधिक असतो, असे या संशोधनात म्हटले आहे. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या कामाच्या वेळा विचित्र असतात. अनेक ठिकाणी जास्त वेळही काम करावे लागते. त्याचा परिणाम शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रक्रियेवर होत असतो.

या संशोधनात हृदयाची आकुंचन क्षमता, रक्तदाब आणि हृदय गती यांच्यात लक्षणीय वाढ झाल्याचे प्रथमच दिसून आल्याचे संबंधित विषयाचा अभ्यास करणारे जर्मनीच्या बॉन इन बॉन युनिव्हर्सिटीचे लेखक डॉ. डॅनिअल कुटिंग यांनी सांगितले. दैनंदिन कामांचा झोपेवर होणारा दुष्परिणाम अभ्यासण्याच्या दृष्टीने या संशोधनाचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

कित्येक काळ अपुरी झोप घेतल्याने पचन क्रिया बिघडणे, नैसर्गिकरित्या उत्पन्न होणारे हायड्रोकॉर्टिझोन संप्रेरक अतिप्रमाणात उत्सर्जित होणे, परिणामी रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटक्याची शक्यताही वाढते.

दरम्यान अतिझोपदेखील शरीरासाठी घातक असून त्यामुळे आयुर्मान कमी होऊन लवकर मृत्यू ओढावण्याची शक्यता असते. पुरेशी झोप घेतल्याने आपल्याला प्राप्त होणारी माहिती मेंदूतील इतर भागांना पोहचविण्याचे काम सुरळीत होत असल्याचेही या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin