Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

त्वचेच्या कर्करोगाचे निदान आता होणार अचूक!


Main News

- त्वचेच्या कर्करोगावर निदान करणारा क्रांतिकारी शोध आस्ट्रेलियातील संशोधकांनी लावला आहे. त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे निदान पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक उपयुक्त आणि अचूक होणार आहे. संशोधकांच्या मते, ‘लिक्विड बायोप्सी’ नामक या रक्त चाचणीमुळे मेलानोमा नामक त्वचेच्या कर्करोगाचे निदान अधिक जलद गतीने होणार असून यामुळे रुग्णाला उपचारासाठीही अधिक अवधी मिळणार आहे.

हा शोध रुग्णांना दिलासा देणारा असून मेलर्बनच्या ओलीवा न्युटॉन- जो कॅन्सर रिसर्च इन्न्स्टिटय़ूट(ओएनजेसीआरआय)मध्ये याविषयीचे संशोधन करण्यात आल्याची घोषणा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याच्या आरोग्यमंत्री जील हँसी यांनी केली आहे.

संशोधकांनुसार, या नव्या संशोधनामुळे त्वचेच्या कर्करोगाचे निदान होणार असून जुन्या पद्धतीनुसारच पण अधिक जलदपणे होणार आहे. यापूर्वी रुग्णांना या चाचणीसाठी ६ दिवसांचा कालावधी लागत होता, मात्र नव्या रक्त चाचणीमुळे केवळ ६ तासांत हे निदान होणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर त्यावरील उपचारदेखील करणे रुग्णांना शक्य होणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin